Startup InvestmentStartup News

रोज केवळ ४५ रुपयांची गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळणार २५ लाख; या स्कीममध्ये आहेत अनेक फायदे | Jeevan Anand Policy

LIC Jeevan Anand Policy: तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसायात, बचत करणे खूप महत्त्वाचे आहे. सध्या अनेक बचत योजना कार्यान्वित आहेत, परंतु योग्य योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर भरीव रक्कम मिळू शकते.

LIC Jeevan Anand Policy: दर महिन्याला काही रुपयेही वाचवले तर भरीव निधी मिळू शकतो. अशा अनेक योजना आहेत ज्यात गुंतवणूक करून तुम्ही आगामी काळात मजबूत बँक बॅलन्स तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, जी गुंतवणूकीसाठी खूप चांगली आहे. जर तुम्ही या योजनेत दररोज फक्त 45 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 25 लाख रुपये मिळतील. ही योजना एलआयसीची आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (Life Insurance Corporation of India) लोकांसाठी अनेक पॉलिसी आणल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे जीवन आनंद पॉलिसी (LIC Jeevan Anand Policy). या योजनेत तुम्ही फक्त थोडीशी गुंतवणूक करून लाखो रुपये उभे करू शकता. जीवन आनंद पॉलिसीचा प्रीमियम टर्म पॉलिसीसारखाच असतो, जितक्या कालावधीसाठी पॉलिसी असेल, तितक्याच कालावधीपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता.

असा घेऊ शकता फायदा

एलआयसीच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे Aadhar Card आणि bank account असणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. देशातील मजूर, विक्रेते, रिक्षाचालक इ. लक्षात घेऊन केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. Jeevan Anand Policy मध्ये मॅच्युरिटीचा लाभ दिला जातो. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास या Policy अंतर्गत 125 टक्के मृत्यू लाभ दिला जाईल. या पॉलिसीमध्ये बोनसचा लाभही दिला जातो. या पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम 1 लाख रुपये आहे. यामध्ये कमाल मर्यादा नाही.

अशाप्रकारे मिळतील २५ लाख

जर तुम्हाला योजनेत मुदतपूर्तीच्या वेळी 25 लाखांचा निधी मिळवायचा असेल तर तुम्हाला अशी गुंतवणूक (investment) करावी लागेल. यासाठी तुम्हाला दररोज 45 रुपये किंवा दर महिन्याला 1358 रुपये गुंतवावे लागतील. ही गुंतवणूक तुम्हाला दीर्घकाळ करावी लागेल. यामध्ये तुम्ही 35 वर्षांपर्यंत मॅच्युरिटी कालावधी निवडू शकता. जर तुम्ही दर महिन्याला 1358 रुपये जमा केले तर तुम्ही एका वर्षात 16,300 रुपये जमा कराल. अशाप्रकारे, तुम्ही 35 वर्षे गुंतवणूक करत राहिल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 25 लाख रुपये मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

error: Content is protected !!