RBI Digital Rupee launch: डिजिटल रुपयाची ‘या’ शहरांमध्ये सुरुवात, करोडो लोकांना होणार व्यवहारात फायदा!

Digital Currency: याबाबत सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केली होती आणि आता देशभरात डिजिटल चलनाला Digital Rupee प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आखल्या जात आहेत.
देशभरात डिजिटल रुपयाच्या व्यवहाराबाबत रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) मोठी मोहीम सुरू झाली आहे. आरबीआय 1 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून रिटेल डिजिटल रुपयाचा (e₹-R) पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. याबाबत सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केली होती आणि आता देशभरात डिजिटल चलनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आखल्या जात आहेत.
आरबीआयने डिजिटल चलनाला (CBDC) सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (Digital Currency) असे नाव दिले आहे. यामुळे देशाला कॅशलेस बनवण्यातही मोठी मदत होणार आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे UPI किंवा Paytm, Google Play आणि PhonePe सारख्या सुविधांवर परिणाम होईल का? असा सवाल उपस्थित होत आहे. पण, मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिजिटल वॉलेट (digital wallet) आणि मोबाईल वॉलेटचा विचार केला तर या दोघांमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. कॅशलेस सिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल पेमेंट (Digital Payment) हा एक नवीन मार्ग आहे. पहिल्यांदा तुम्हाला एकदा डिजिटल रुपया विकत घ्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या वॉलेटमधून व्यवहार करू शकाल. RBI Digital Rupee launch
अशा प्रकारे डिजिटल रूपयाने होणार व्यवहार
- सहभागी बँकांनी ऑफर केलेल्या आणि मोबाईल फोन/डिव्हाइसवर साठवलेल्या डिजिटल वॉलेटद्वारे वापरकर्ते ER-R सह व्यवहार करू शकतील.
- व्यवहार व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) आणि व्यक्ती-ते-व्यापारी (P2M) दोन्ही असू शकतात.
- व्यापारी स्थानांवर प्रदर्शित क्विक रिस्पॉन्स (QR) कोड वापरून व्यापाऱ्यांना पेमेंट केले जाऊ शकते.
या बँका डिजिटल रुपया सुरू करतील
पहिला टप्पा देशभरातील चार शहरांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या चार बँकांसह सुरू होईल. सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार, या पायलटमध्ये Digital Rupee टप्प्याटप्प्याने सहभागी होण्यासाठी आठ बँकांची ओळख पटवण्यात (Can we invest in digital rupee?) आली आहे. नंतर आणखी चार बँका, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक या पायलटमध्ये सामील होतील.
ब्लॉकचेन आधारित डिजिटल सिस्टम
दरम्यान, डिजिटल चलन ही एक प्रकारची ब्लॉकचेन आधारित डिजिटल सिस्टम आहे, ज्या अंतर्गत तुम्ही व्यवहार करू शकाल. याशिवाय, रिटेल व्यवहार चलनासाठी तुम्हाला (How is digital rupee different from UPI?) कोणत्याही बँकेला सामील करण्याची गरज नाही, म्हणजेच तुम्ही त्याशिवाय व्यवहार करू शकता. ही प्रणाली UPI पेक्षा खूप वेगळी आहे.
कोणत्या शहरात होणार सुरुवात?
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 4 शहरांमध्ये याची सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा ही सेवा मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू आणि भुवनेश्वर येथे सुरू होईल. त्यानंतर हैदराबाद, अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, इंदूर, कोची, लखनौ, पाटणा आणि शिमला येथे वाढवण्याची योजना आहे. याशिवाय, सर्वात आधी या सेवेची सुरुवात SBI, ICICI Bank, Yes Bank, IDFC First Bank सह सुरू होईल.यानंतर Bank of Baroda, Union Bank, Kotak Bank आणि HDFC Bank यांचा त्यात समावेश केला जाईल.
ई-रुपी सादर करण्याचे कारण
हे रुपयाचे विद्यमान डिजिटल स्वरूप बदलणार नाही, परंतु व्यवहाराचे दुसरे माध्यम प्रदान करेल. ई-रुपी डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देईल, असा (Digital rupee launch) विश्वास आरबीआयला (RBI) आहे. रोख अर्थव्यवस्था कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल. तसेच व्यवहार खर्च कमी होण्यास मदत होईल. पेमेंट सिस्टम अधिक प्रभावी होईल. (RBI decision)
EXCELLENT 😊👍
Sir plz let me know I am in Mumbai ICICI bnk ac holder how do I buy digital rupee