agriStartup Story

Agriculture News: 25 वर्षाच्या शेतकऱ्याची कमाल, सव्वा एकरात पपईतून 23 लाखांचं उत्पन्न, वाचा या शेतकऱ्याची यशोगाथा

Papaya Agriculture: सांगली (Sangli) जिल्ह्यातील कुंडल (Kundal) येथील प्रतिक पुजारी या युवा शेतकऱ्यानं पपईच्या शेतीतून (Papaya Farming) भरघोस नफा मिळवला आहे. सव्वा एकरमध्ये 23 लाखांचे उत्पन्न घेतलं आहे.

शेतकऱ्यांना (farmer) सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट सुरुच असतात. पण या संकटावर मात करुनही काही शेतकरी उत्तम प्रकारची शेती (Good farming) करताना दिसत आहेत. योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं भरघोस उत्पादन घेत आहेत. अशाच एका युवा शेतकऱ्यानं सव्वा एकर पपईच्या शेतीतून (Papaya Farming) आत्तापर्यंत तब्बल 23 लाखांचे उत्पन्न घेतलं आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील कुंडल (Kundal) येथील प्रतिक पुजारी (Pratik Pujari) असं या 25 वर्षीय युवा शेतकऱ्याचं नाव आहे. नेमकं त्यांनी एवढं भरघोस उत्पादन कसं घेतलं? त्यांनी पपई शेतीचं नेमकं नियोजन कसं केलं? याबाबतची माहिती पाहुयात….

पपईच्या 1 हजार 100 झाडांची लागवड (Plantation of 1 thousand 100 papaya trees)

Agriculture news in marathi: प्रतिक पुजारी हे सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचे शेतकरी. त्यांनी त्यांच्या सव्वा दोन एकरवर क्षेत्रावर पपईची लागवड केली आहे. या सव्वा एकरमध्ये जवळपास 1 हजार 100 पपईची झाडे (Red Lady papaya farming) लावली आहेत. पपईची बाग लावून त्यांना दोन वर्ष झाली. या पपईचे गेल्या 18 महिन्यापासून उत्पादन सुरुच आहे. आत्तापर्यंत 210 टन पपईचे उत्पादन निघाल्याची माहिती प्रतिक पुजारी यांनी न्यूज चॅनलशी बोलताना दिली. या उत्पादनातून 23 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे प्रतिक पुजारी यांनी सांगितले. मी ’15 नंबर’ या पपईच्या वाणाची लागवड केली होती. त्यामधून भरघोस उत्पादन निघाल्याचे प्रतिक पुजारी म्हणाले.

पपईला किलोला 9 ते 28 रुपयापर्यंतचा दर मिळतोय (Papaya fetches price ranging from Rs 9 to Rs 28 per kg)

आत्तापर्यंत सव्वा एकर पपईच्या शेतीतून 210 टन उत्पादन मिळालं आहे. आणखी 30 टन उत्पादन (Agriculture Department) निघण्याची शक्यता असल्याची माहिती प्रतिक पुजारी यांनी न्यूज चॅनलशी बोलताना दिली. सर्व पपईची विक्री ही मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये झाली आहे. पपईला Agriculture News चांगली मागणी असल्यामुळं आम्हाला फायदा झाला. इतरांच्या पपईपेक्षा आमच्या पपईला वजन जास्त भरत होते. त्याचा आम्हाला फायदा झाल्याचं प्रतिक पुजारी यांनी सांगितलं.

कसं केलं नियोजन? (How did you plan?)

  • या पपईच्या शेतीसाठी रासायनिक तसेच सेंद्रीय खतांचा वापर केला.
  • जमिनीचा सेंद्रीय कर्ब वाढवला
  • पिकांची फेरपालट केली
  • पपईच्या लागवड करण्यापूर्वी मातीचं परिक्षण केलं
  • पाण्याचे योग्य नियोजन केले.
  • ड्रीप पद्धतीनं बागेला पाणीपुरवठा
  • बागेसाठी सर्व औषधे ही एस व्ही अॅग्रो कंपनीची (SV AGRO COMPANY) वापरली.
  • शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला (Modern technology in agriculture)

योग्य नियोजन आणि चांगल्या दराचा फायदा : कृषी सहाय्यक (Agricultural Assistant)

प्रतिक पुजारी यांच्या पपई शेतीबाबत कुंडलचे कृषी सहाय्यक सलगर यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ झालं त्यांची पपई मार्केटमध्ये चालू आहे. त्यांच्या पपईला बाजारपेठेत Agriculture News चांगला दर मिळत आहे. त्यामुळं पुजारी यांना चांगला नफा मिळाल्याची माहिती कृषी सहाय्यक सलगर यांनी दिली. तसेच सध्या पपईला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मागणी वाढत असल्यानं दरात वाढ झाल्याचे सलगर म्हणाले. पपईच्या 15 नंबर वाणाला (15 varieties of papaya) बाजारात चांगली मागणी आहे. तसेच यावर रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात होतो. पण शेतकऱ्यांनी मार्केट बघून पपईचे उत्पादन घ्यावं असेही सलगर म्हणाले. सलगर यांचा माल व्यापारी जागेवरुन उचलत असल्यानं त्यांना चांगला फायदा झाल्याचे सलगर म्हणाले. प्रतिक पुजारी यांनी त्यांच्या पपई बागेचं (Desi Papaya Farming) योग्य नियोजन केल्यामुळं त्यांना भरपूर नफा मिळाल्याचे सलगर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

error: Content is protected !!