Startup NewsStartup Story

Central Government Scheme; आता रेशन दुकानातही काढता येणार पासपोर्ट आणि पॅन कार्ड, इतरही अनेक सुविधा; वाचा काय आहे योजना?

यापुढे रेशन दुकानातही पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्ज (Central Government Scheme) करण्याची सुविधा पुरवली जाणार आहे. (ration card)

यापुढे रेशन दुकानातही पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्ज (ration shops) करण्याची सुविधा पुरवली जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या घराजवळ अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारनं (Central Government’s big decision) मोठं पाऊल उचललं आहे. देशातील सर्व रेशन दुकानं आता कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) बनवली जाणार असून अऩेक सुविधा नागरिकांना या ठिकाणी पुरवण्यात येणार आहे

काय आहे योजना

अन्न मंत्रालयाच्या कक्षेत रेशन धान्याची दुकानं येतात. या मंत्रालयानं ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेडसोबत एकत्र येत ही योजना तयार केली आहे. (passport and pan card) यामुळे रेशन दुकानांचं उत्पन्न वाढायलाही मदत होणार आहे. रेशन दुकानातून धान्य खरेदी करतानाच नागरिक पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्जही भरू शकणार आहेत. वीज आणि पाण्याचं बिलदेखील रेशन दुकानांमध्ये स्विकारलं जाणार आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं (Ministry of Consumer Affairs, Food & Public Distribution) रेशन दुकानांचं उत्पन्न वाढवण्यासाठी CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड (CSC) सोबत करार केला आहे.

दुकानदारांना निवडीचं स्वातंत्र्य

रेशन धान्य दुकान चालवणाऱ्या दुकानदारांना कुठल्या सुविधा पुरवायच्या, याची निवड करता येणार आहे. सीएससीअंतर्गत विविध सुविधा पुरवल्या जाणार असल्या तरी आपल्याला योग्य वाटतील अशा सेवांसाठी रेशन दुकानदार अर्ज करू शकतील. (Ration Shops to provide passport and pan card application facility) सर्वच्या सर्व किंवा काही निवडक सुविधा आपल्या दुकानात उपलब्ध करून देण्याचा पर्याय रेशन दुकानदारांसमोर असणार आहे.

निवडणूक आयोगाशी संबंधित सेवाही मिळणार

रेशन दुकानांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज, पॅन कार्डसाठी अर्ज, लाईट बिल भरणे, पाण्याचं बिल भरणे आणि निवडणूक आयोगाशी संबंधित कामांची सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. या सुविधांचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच उपयोग होणार असून या कामांसाठी करावी लागणारी पायपीट कमी होणार आहे. या सुविधा इतरत्रही उपलब्ध आहेत, मात्र त्यात आता आणखी एका पर्यायाची भर पडणार आहे. रेशन दुकानधारकांचं उत्पन्न वाढायलाही या निर्णायामुळे मदत होणार आहे. Central Government Scheme

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

error: Content is protected !!