Startup Story

Milk business दूध व्यवसाय गावामध्येच करा कमी खर्चात मोठी कमाई, गाय जातीची निवड, फायदे इ.

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशातील जवळजवळ 60% पेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. आज आपल्याला माहीत आहे की नुसती शेती करून पोट भरणे खूप कठीण आहे कारण की आज काही लोकांकडे खूप कमी जमीन आहे. तसेच जमीनीमध्ये पीक चांगले आले तर त्याला हमीभाव भेटत नाही, काही वेळा चांगले आले पीक आले तर अवकाळी पावसाने खूप नुकसान होते. आज महाराष्टात काही जिल्हे आहेत त्यामध्ये सारखा दुष्काळ किवा पाऊस पडत नाही. Milk business

त्यामुळे हे लोक शेती करत-करत जोड व्यवसाय करण्याचा विचार करत असतात आणि काही लोक करत आहेत. या मध्ये दूध व्यवसाय, शेळी पालन, कोंबडी पालन, एत्यादी.

Table of Contents

दूध व्यवसाय हा चांगला आणि फायदेशीर व्यवसाय आहे. हा व्यवसाय आपण शेती करत करू शकतो. दूध व्यवसाय करण्यासाठी आपण संकरीत गाई, देशी गाई, गावठी दुधाळ गाई आणि दुधाळ म्हशी प्रामुख्याने पाळल्या जातात.

आज आपल्याला रोज 300 मिली दुधाची गरज आहे, आणि वाढत्या लोकसंख्यामुळे दुधाचे प्रमाण वाढवले पाहिजे. आज आपल्या देशामध्ये 45% गाईपासून आणि 55% म्हशी पासून दूध मिळते. गाईच्या एक लीटर दुधामध्ये 600 किलो कॅलरी आणि म्हशीच्या एक लीटर दुधापासून 1000 किलो कॅलरी मिळतात.

दुधापासून अनेक पदार्थ बनत आहेत त्यामुळे हा व्यवसाय खूप फायदेशीर आहे. आज आपल्या देशामध्ये 60% लोक शेती करत आहेत आणि जवळ जवळ 72% लोक हे खेड्यामध्ये राहत आहेत. आज 7 करोड शेती परिवारामध्ये प्रत्येकी दोन ग्रामीण घरामध्ये दूध व्यवसाय केला जातो.

आज जगामध्ये दूध व्यवसायामध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो व त्यानंतर अमेरिका, पाकिस्तान, चीन आणि ईतर देशांचा समावेश आहे. विकिपीडिया च्या महितीनुसार आज भारतामध्ये दुधाचे उत्पादन 114.9X 1000000000 किलो / वर्षी होते आणि जगामध्ये 470X1000000000 किली/वर्षी येवढे होते

सध्या तुमच्या जवळ कमी शेती किवा शेती नसली तरी हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकता यासाठी तुम्हाला चारा, पाणी आणि शेडची व्यवस्था करावी लागते. हा व्यवसाय एकदा का चांगल्या प्रकारे सुरू झाला तर तुमचा आठवड्याचा खर्च तुम्ही बाघवु शकता.

गाय जातीची निवड

जेव्हा तुम्ही दुग्ध व्यवसाय करण्याचा विचार करता त्यावेळी तुम्हाला योग्य ती गायीची निवड करावी लागते, कारण की नुसत्या गायी पाळून फायदा नाही तर हा ही विचार केला पाहिजे की त्या दूध किती देतात, त्यांना चारा किती लागतो, त्यांसाठी निवारा, दवाखान्याचा खर्च, एत्यादी.

आता आपण कोणत्या प्रकारच्या गायी आहेत आणि याचे फायदे कोणते आहेत ह्या विषयी जाणून घेऊया. Milk business

मालवी गायी 

या गायी रोज 12 लीटर दूध देतात. या गायी ग्वाल्हेरच्या आजूबाजूला आढळतात. ह्या जास्त दूध देत नाहीत, यांचा रंग खाकी आणि मान थोडी काळी असते.

नागौरी गायी 

ह्या जोधयपूरच्या आसपास एरिया मध्ये आढळतात, ह्या गायी जास्त दूध देत नाहीत. नागौरी गाय रोज 6-8 लीटर दूध देतात. वासरा नंतर थोडे दिवस दूध देतात.

थारपारकर गायी 

ह्या गायी जास्त दूध देतात, यांचा रंग खाकी किवा पंधरा असतो. कच्छ, जैसलमेर, जोधपूर आणि सिंधचे वाळवंट हे क्षेत्रात आढळतात.

पवार गायी 

पवार गायी कमी दूध देतात, पवार गायी पीलीभीत, पूरणपूर तहसील आणि खेरी येथे आढळतात, त्यांचे तोंड अरुंद, शिंगे सरल आणि लांब असतात. शिंगाची लांबी 12-18 इंच असते.

भागणाडी गायी 

ह्या गायी भरपूर दूध देतात. भागणाडी नाडी नदीच्या काठी आढळतात. ज्वारी ही त्यांचे आवडते खाद्य आहे. नाडी गवत आणि त्याची रोटी बनवून त्यांना खायला दिले जाते.

दज्जल गायी 

पंजाबच्या डेरागजीखान जिल्ह्यात आढळतात आणि ह्या गायी कमी दूध देतात.

गावलाव गायी  

ह्या गायी दूध मध्यम प्रमाणात देतात. गावलाव गायी  सातपुडा, वर्धा, छिंदवाडा, नागपूर, सिवनी ह्या ठिकाणी आढळतात.  यांचा रंग पंधरा आणि मध्यम ऊंची असते. चालताना ह्या कान वर करून चालतात.

हरियाणा गायी 

ह्या गायी रोज 8 ते 12 लिटर दूध देतात. यांचा रंग पांढरा, मोती किंवा हलका तपकिरी असतो. ह्या उंच देहाच्या असतात. चालताना डोके वर करून चालतात. रोहतक, हिसार, सिरसा, करनाल, गुडगाव आणि जींद ह्या ठिकाणी आढळतात.

करण फ्राय गायी 

थारपारकर गाईचे दुध उत्पादन सरासरी आहे. उष्ण आणि दमट हवामान सहन करण्याची त्यांच्या क्षमतामुळे ह्या महत्त्वपूर्ण आहेत. ह्या गायी राजस्थान मध्ये आढळतात.

गीर गायी 

ह्या गायी रोज 50-80 लीटर दूध देतात. त्यांचे मूळ ठिकाण काठीयवाडचे गीर जंगल आहे.

देवणी गायी 

ह्या गायी दूध भरपूर देतात, आणि यांचे ठिकाण दक्षिण आंध्र प्रदेश आणि हिन्सोलमध्ये आढळले.

नीमाडी गायी 

नर्मदा नदीचे खोरे ह्या ठिकाणी आढळतात. एकदा त्यांनी दूध द्यायला सुरवात केली की ते 10 महिन्यांपर्यंत दूध देतात. दुधाचे प्रमाण दररोज 10-16 लीटर असते. त्यांच्या दुधात लोणीचे प्रमाण पुरेसे असते. या गायींचे डोके रुंद, शिंग लहान आणि जाड आहे आणि कपाळ मध्यम आकाराचे आहे. हे पंजाबमधील मॉन्टगोमेरी जिल्ह्यात आणि रावी नदीच्या आसपास आढळते. तसेच ह्या गायी भारतात कोठेही पाळल्या जाऊ शकतात. Milk business

सिंधी गायी 

त्यांचे मुख्य स्थान सिंधचा कोहिस्तान प्रदेश आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर ते 300 दिवसात किमान 2000 लिटर दूध देतात. ते इतर हवामानातही जगू शकतात आणि रोगांशी लढण्याची त्यांच्यात रोगप्रतीकारक शक्ती आहे. या गायींचा रंग बदामी किंवा गहू आहे, शरीर लांब आणि चामडे जाड आहे.

दूध व्यवसाय करण्याअगोदर ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. 

दूध व्ययवसाय हा एक चांगला आणि खूप फायदेशीर व्यवसाय आहे. यामध्ये योग्य गायींची निवड, त्यांचे पालन पोषण, त्यांना चारा, राहण्याची व्यवस्था केल्यास हा व्यवसाय खूप तेजीत चालू शकतो. ह्या साठी खाली काही इम्पॉर्टंट पॉइंट दिले आहेत.

दुग्ध व्यवसायाचा विस्तार करण्याचे मूलभूत कारण

तुमचा अगोदर पासून व्यवसाय आहे आणि तुम्ही याचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुम्ही ज्या गायींचे पालन करत आहात ह्यांच्या विषयी माहिती असणे गरजेचे आहे. Milk business

जसे की ह्या वर्षाला किती दूध देतात, त्यांना किती चारा लागतो, यांचा दावाखाण्याचा खर्च, एत्यादी माहीत असेल तर तुम्ही गायीची निवड करून त्याचा विस्तार करू शकता. म्हणजेच उत्पन्न- खर्चाचा हिशेब ठेवणे हे दुधाच्या व्यवसायात वाढ करण्याचा आधार आहे.

आर्थिक कार्यक्षमतेचे अचूक मूल्यांकन

जर तुम्ही हा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल किवा तुमचा अगोदर पासून व्यवसाय आहे व तुम्ही याचा विस्तार करण्याचा विचार करत आहे.

पण तुमच्याकडे भांडवल नाही. यासाठी तुम्ही आर्थिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते कर्ज आपण कशा प्रकारे परत करू शकतो याचे अचूक मूल्यांकन असणे गरजेचे आहे.

दुग्ध व्यवसायात मजदूरांचे मूल्यांकन

आज खेड्यामध्ये ज्यांच्याकडे कमी गायी आहेत हे लोक गायींची देखरेख स्वता: करतात. पण जे लोक याचा मोठ्या प्रमाणात गायींचे पालन करत आहेत त्यांसाठी मजदूरांची गरज पडते.

जर तुम्ही स्वता: गायींची देखरेख करत असाल तरीही त्यांचा हिशेब राखणे गरजेचे आहे. यावरून आपल्याला हे लक्ष्यात येईल की आपल्याला गायी पाळण्यासाठी एकूण किती खर्च मजदूरांसाठी लागतो.

योग्य गायींची निवड

योग्य गायींची निवड तुम्ही जेव्हा करू शकता ज्यावेळी तुम्हाला प्रत्येक गायी विषयी माहिती आहे. यामुळे तुम्हाला हे माहीत होईल की याचे पालन केले तर आपल्याला दूध किती भेटेल, त्यापासून खत, यांना लागणारा खर्च, एत्यादी.

गायींच्या पुनरुत्पादन विषयी माहिती 

वैज्ञानिक मार्ग पशुसंवर्धनाचा पहिला महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. वैज्ञानिक पद्धतीने पुनरुत्पादन करणे हे केवळ तेव्हाच शक्य होईल जेव्हा प्राण्यांच्या पुनरुत्पादनाचे तपशीलवार वर्णन जसे की उन्हाळ्यात मादी प्राण्याच्या आगमनाची तारीख, तिला दिलेल्या कृत्रिम गर्भाधानांची तारीख, उत्सर्ग होण्याची तारीख, एत्यादी.

 अन्य काही मुख्य गोष्टी 

  • गायींच्या पोषण विषयी माहिती
  • पशु व्यवस्थापनाशी संबंधित माहिती
  • गायींचे खरेदी / विक्री खाते

दुग्ध व्यवसाय फायदे

वर आपण दूध व्यवसाय या विषयी माहिती बागीतली की कशा प्रकारे हा व्यवसाय करता येतो. आता आपण याचे फायदे कोणते आहेत याविषयी जाणून घेणार आहोत

  • शेती करत असल्यास आठवड्याचा खर्च तुम्ही भागवू शकता.
  • शेतीला जोड व्यवसाय म्हणून चांगला व्यवसाय आहे.
  • हा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून अनुदान भेटते.
  • गायीचे खत आपण आपल्या शेतीसाठी किवा बाहेर विकू शकतो. Milk business

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

error: Content is protected !!