Startup InvestmentStartup Story

Multibagger Stock: लॉटरीच लागली! खोऱ्यानं पैसा ओढत आहेत, या शेअरवर 1263% परतावा प्लस स्टॉक स्प्लिट प्लस फ्री बोनस शेअर्स

Share Market Penny Stock: हाउसिंग फायनान्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी स्टार हाऊसिंग फायनान्सने (Star Housing Finance) आपल्या शेअर धारकांना सुखद धक्का दिला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे ही कंपनी आपल्या शेअर धारकांना दुहेरी फायदा देण्याच्या तयारीत आहे. कंपनी प्रथम आपल्या पात्र विद्यमान गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करेल, आणि शेअर्स विभाजित (Stock Split) करणार आहे. 2022 या वर्षात स्टार हाऊसिंग फायनान्स कंपनीने आपल्या गुतवणूकदारांना 149 टक्क्याहून जास्त नफा कमावून दिला आहे. 2015 सालापासून आतापर्यंत या स्टॉकने (Multibagger Stock) 1263 टक्क्याहून अधिक परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टार हाऊसिंग फायनान्स कंपनीचे शेअर 216.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSENSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Star Housing Finance Share Price | Star Housing Finance Stock Price | BSE 539017)

गुंतवणूकदारांना श्रीमंत केले (Made Investors Rich)

हाऊसिंग फायनान्स क्षेत्रातील या मल्टीबॅगर स्टॉक रिटर्नने (Multibagger Stock Return) 2022 मध्ये गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. या (Star Housing Finance) ने यावर्षी गुंतवणूकदारांना 150 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. दुसरीकडे, गेल्या सहा महिन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या समभागाने गुंतवणूकदारांना 131 टक्के नफा दिला आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी स्टार हाउसिंग फायनान्सचे शेअर्स 211.35 रुपयांवर बंद झाले. गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये हाऊसिंग फायनान्सचा हिस्सा 85.9 रुपयांच्या पातळीवर होता. शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

शेअर किंमतीचा इतिहास (Share price history)

Stock Market Live News Update: गृहनिर्माण वित्त पुरवठा क्षेत्रातील या मल्टीबॅगर कंपनीच्या स्टॉकने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या स्टॉकमध्ये 155 टक्क्यांहून जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. स्टॉकचे मागील सहा महिन्यांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, या कंपनीच्या स्टॉकने (Share market holiday) लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 61.70 टक्के वाढवले आहेत. 20 मार्च 2015 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या शेअरने 1263 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे.

बोनस शेअर जारी (Issue of bonus shares)

Multibagger Stock: कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या विद्यमान शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत दिला जाणार आहे. यासोबतच संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिट करण्याच्या प्रस्तावाला ही मंजुरी देण्यात आली आहे. जर समजा तुमच्या शेअर (How to invest in share market) पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचे 100 शेअर्स आहेत, तर स्टॉक स्प्लिटनंतर तुमच्या शेअर्सची संख्या 200 होईल. स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची (Bonus Stock) वाटप करण्याची रेकॉर्ड डेट 16 डिसेंबर 2022 असेल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

कंपनीचे लक्ष ग्रामीण आणि निमशहरी भागावर आहे

स्टार हाऊसिंग फायनान्सचा मुख्य फोकस ग्रामीण भागात गृहनिर्माण वित्तपुरवठा करण्यावर आहे. पूर्वी ही कंपनी Akme Star Housing Finance Company म्हणून ओळखली जात होती. कंपनी ग्रामीण आणि निमशहरी भागात आपला व्यवसाय करते. कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे आहे. विशेष बाब म्हणजे स्टार हाऊसिंग फायनान्स प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) साठी PLI योजनेअंतर्गत नोंदणीकृत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

error: Content is protected !!