Startup Story

Poultry Farm Business Plan: पोल्ट्री फार्म व्यवसाय योजना

Poultry Farm Business: कुक्कुटपालन व्यवसाय

व्यवसायाचा आराखडा तयार करण्यापूर्वी खाली दिलेले काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतले जावेत. पोल्ट्री फार्मसाठी उपलब्ध जागा, कुक्कुटपालन शेड खर्च/पोल्ट्री फार्म शेड खर्च, पुरेसे भांडवल, मजूर, बाजारपेठ व उत्तम कोंबडी जात, लसीकरण, कोंबडी खाद्य यांविषयी आवश्यक ज्ञान इत्यादि. या महत्वपूर्ण घटकांवर तुमच्या कुक्कुटपालन व्यवसायाचे यश अवलंबून असते.

कुक्कुटपालन व्यवसाय कसा करायचा ते

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Poultry Farm Business Plan

पोल्ट्री फार्मसाठी जागा

तुम्ही पोल्ट्री शेडमध्ये किती पक्षी ठेवणार आहात यावरून शेडची जागा निश्चित केली जाते.

जर तुम्ही शेडमध्ये 1000 पक्षी पालनाचे नियोजन करत असाल तर 1000 पक्षांच्या संगोपनासाठी शेडची जागा 1200 square feet असायला हवी. शेडची दिशा ही पूर्व पश्चिम असायला हवी. म्हणजे शेडची लांबी ही पूर्व पश्चिम असायला हवी, असे केल्याने सूर्याची उष्णता डायरेक्ट शेडमध्ये प्रवेश करणार नाही.

पोल्ट्री शेड बांधण्यापूर्वी जागेची निवड कशी करावी

1. पोल्ट्रीची नियोजित जागा ही उंचावर असावी

2. लोकवस्तीपासून पोल्ट्री शेड दूर असावे

3. वाहनांचा मोटार गाड्यांच्या आवाजांचा पक्ष्यांना त्रास होणार नाही अशी जागा निवडावी.

4. शेडमध्ये मोकळी स्वच्छ हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

5. शेड भोवती असलेले गवत, झुडपे, जुने साहित्य यांची विल्हेवाट लावावी व भोवतालची जागा स्वच्छ करून घ्यावी.

6. शेड भोवती सांडपाणी खराब पाणी साठू देऊ  

ब्रॉयलर कोंबडीच्या जाती (पोल्ट्री ब्रीड/चिकन ब्रीड)

COBB

या पक्षाचे पाय हे पिवळ्या रंगाचे असतात. हे ब्रीड वजन सुद्धा चांगले देते, हे ब्रीड ए वन क्वालिटीचे समजले जाते.ROSS

या पक्षाचे पाय हे जवळ जवळ लाल व गुलाबी रंगाचे असतात. हे ब्रीड मध्यम गुणवत्तेचे आहे.Hubbard

या पक्षाचे पाय हे पांढर्‍या रंगाचे असतात. cobb आणि ross च्या तुलनेत या ब्रीडची गुणवत्ता थोडी कमी असते. हे ब्रीड खाद्य थोडे जास्त खाते परंतु त्या तुलनेत वजन देत नाही. cobb आणि ross च्या तुलनेत हे ब्रीड थोडे स्वस्त मिळते.

ग्रामीण भागात कर हा व्यवसाय सुरू आणि कमवा लाखो रुपये gramin bhagatil business idea

प्रत्येक जातीच्या कोंबडीला लसीकरण करणे आवश्यक आहे का?

कोंबड्या साथीच्या रोगांना बळी पडू नयेत म्हणून प्रत्येक जातीच्या कोंबड्याना लसीकरण करणे आवश्यक आहे. मग ओरिजनल गावठी कोंबडी का असेना, लसीकरण अत्यंत आवश्यक आहे.

कुक्क्टपाल नासाठी ब्रॉयलर कोंबडीची निवड करण्याचे फायदे

ब्रॉयलर कोंबडी 40 ते 45 दिवसात विक्रीस तयार होते. ब्रॉयलर कोंबडी पालनामध्ये महत्वाचे म्हणजे ब्रॉयलर कोंबडीच्या आरोग्याकडे थोडे जास्त लक्ष द्यावे लागते. थंडी, वारा, पाऊस व उष्णता यांपासून या पक्षांचा बचाव करावा लागतो. पक्षांची योग्य काळजी न घेतल्यास वातावरणातील बदलांचा या पक्षांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो व त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते.

कोंबड्यांचे आरोग्य व्यवस्थापन

कुक्कुटपालन हा व्यवसाय नाजुक व्यवसाय समजला जातो. कुक्कुटपालन व्यवसायामध्ये साथीचे रोग अधिक असल्यामुळे कोंबड्या जास्तकरून साथींच्या रोगांना बळी पडतात. त्यामुळे या व्यवसायामध्ये कोंबड्याच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असते.

शेड बांधकाम खर्च

लोखंडी अॅंगल, छताचा पत्रा, लोखंडी जाळी, सीमेंट, वीट, ड्रिंकर, फीडर, पाण्याची टाकी या सर्वांचा एकुण खर्च 220,000 रुपये इतका जाऊ शकतो. साहित्याचे दर वाढल्यास कॅलक्युलेशन बदलू शकते.

पिल्ले खरेदी, विमा व वीज

30,000 हजार रुपये

2 Comments

  1. My name is
    Suresh shingade
    I am from Kolhapur Maharashtra, and I am looking to do this kind of Busines requesting you to please contact me on below number for further information.

    Number – 8355864755

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

error: Content is protected !!