RTO Services: आता घरी बसूनच वाहन होणार ‘ट्रान्सफर’ आणि Driving License पण काढता येणार, RTO च्या १४ नव्या ‘फेसलेस’ सुविधांचा घरबसल्या लाभ घेता येणार !

How to Apply Online For Driving License: केंद्र सरकारने आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. यासाठी परिवहन (Parivahan) विभागाच्या संकेतस्थळावर आधारकार्ड नंबर टाकून माहिती व शुल्क भरून आरटीओच्या १४ फेसलेस सेवांचा लाभ घेता येणार आहे. RTO Services
आधार क्रमांकाचा वापर करून ‘faceless’ पद्धतीने ‘RTO’च्या १२ सेवा दिल्या जात होत्या. आता आणखी दोन सेवांची भर पडली. त्यात घरी बसूनच वाहन हस्तांतरण (transfer) आणि तात्पुरती नोंदणीही करता येईल. केंद्र सरकारने आधार क्रमांकाचा वापर करून ‘faceless’ सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. यासाठी परिवहन विभागाच्या (Department of Transport) संकेतस्थळावर आधारकार्ड नंबर टाकून माहिती व शुल्क भरून आरटीओच्या १४ फैसलेस सेवांचा लाभ घेता येणार आहे.
काय सुविधा? (RTO Facility)
‘लर्निंग लायसन्स’ परीक्षा, टुप्लिकेट आरसी, डुप्लिकेट लायसन्स, लायसन्ना नूतनीकरण, एनओसी, आरसी किंवा लायसन्सवरील पत्ता बदल, कंडक्टर लायसन्सचे नूतनीकरण, वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, वाहन हस्तांतरण, परमिट हस्तांतरण, विशेष परमिटसाठी अर्ज, परिवहन सेवेतील रेकॉर्डमध्ये मोबाइलचा नंबर नोंदविणे, कर्जबोजा रद्द करण्यासह आता वाहन ट्रान्सफर व तात्पुरती नोंदणी सेवेचा समावेश. (‘Learning License’ Examination, Duplicate RC, Duplicate License, License Renewal, NOC, RC or Address Change on License, Conductor License Renewal, Vehicle Fitness Certificate, Vehicle Transfer, Permit Transfer, Application for Special Permit, Registering Mobile Number in Transport Service Record, Debt Cancellation Now including vehicle transfer and temporary registration services.)
असा करा अर्ज (Apply like this)
- वाहन विकणाऱ्यांनी व वाहन विकत घेणाऱ्यांनी ‘parivahan.gov.in‘ या संकेतस्थळावरून वाहन हस्तांतरणाकरिता आधार क्रमांकाचा वापर करून अर्ज करावा.
- वाहन व चेसीस क्रमांकाचे छायाचित्र ओळखपत्रासह अपलोड करावे RTO Services
- अर्ज पूर्ण केल्यानंतर नमुना २९ ची एक प्रत मूळ नोंदणी प्राधिकरणास ई-मेलद्वारे प्राप्त होईल. अर्जदारास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. प्राप्त अर्ज छाननी करून दोन दिवसांच्या आत निकाली निघेल.
तात्पुरत्या नोंदणीसाठी हे करा (Do this for temporary registration)
- ‘फेसलेस’ सेवेच्या मदतीने तात्पुरती नोंदणी ही सेवा परिवहन संवर्गातील वाहन वैयक्तिक नावावर नोंदणी करावयाचे असलेल्या अर्जदारांसाठी सुरू करण्यात येत आहे.
- वाहन वितरकांनी ‘parivahan.gov.in‘ या संकेतस्थळावरून वाहनाचे तात्पुरती नोंदणी अजचि एन्ट्री व व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करून कागदपत्रे अपलोड करा.
- वाहन वितरकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. अर्जामध्ये त्रुटी असल्यास ‘RTO’ कार्यालय वाहन वितरकास माहिती देईल. (Parivahan)
कर्ज नसलेल्या वाहनांचेच होणार हस्तांतरण (Only non-loan vehicles will be transferred)
‘फेसलेस’मधील वाहन हस्तांतरण ही सेवा कर्जबोजा नसलेल्या वाहनांसाठी असणार आहे. याशिवाय, खासगी संवर्गातील वाहने व वैयक्तिक नावावर वाहन असलेल्या अर्जदारांकरिता राहणार आहे. (Driving licence check online)
घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स
How to Apply Online For Driving License : ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया पूर्वी खूप किचकट आणि वेळखाऊ होती. यासाठी लोकांना सतत आरटीओ…..
How To Apply for Driving Licence Online In Maharashtra
- सर्वात आधी परिवहन विभागाच्या https://parivahan.gov.in/parivahan/hi वेबसाईटवर जा
- त्यानंतर Online Services मध्ये जा आणि Driving Licence Related Services वर क्लिक करा
- तुम्ही ज्या राज्यात राहताय ते राज्य सिलेक्ट करा
- यानंतर ‘Learner’s Licence Application’ वर क्लिक करा
- त्यानंतर तेथे लिहिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि नंतर तिथे तुमचे वैयक्तिक डिटेल्स भरा
- त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर विचारला जाईल.
- learner’s licence अॅप्लिकेशन फॉर्म भरा आणि तिथे मागितलेले दस्तऐवज अपलोड करा
- त्यानंतर तुमच्या सोयीनुसार ड्रायव्हिंग टेस्टची तारीख निवडा आणि पेमेंट प्रोसेस करा. (Driving Licence download)