Startup InvestmentStartup Story

Women Loan Scheme: उमेद अभियानांतर्गत बचत गटातील महिलांना मिळणार विनातारण 20 लाख रु कर्ज!

Mahila Bachat Gat Information in Marathi: तळागाळातील कुटुंबाना स्वयंरोजगार मिळावा व दारिद्रय (Mahila Bachat Gat Yojana 2022) कमी होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून सरकार विविध योजना राबवते. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (Umed). ग्रामीण भागात महिला विशिष्ट उद्दीष्ट घेऊन एकत्र येतात. त्यांना सरकार या अभियानातून बळ देत आहे.

अभियानाच्या माध्यमातून राज्यातील गरजू महिलांना 20 लाख रुपये कमी व्याज दराने मिळणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे तारण ठेवण्याची गरज नाही (Which is the best loan for women?) अगदी कमीव्याजी हे कर्ज महिलांना मिळणार आहे. २० लाख रुपये कर्ज (Loan) घेऊन महिला आपला छोटासा किंवा अतिशय मोठा उद्योग देखील सुरू करू शकतात. किंवा तुमच्या वैयक्तिक उपयोगासाठी देखील या पैशाचा उपयोग तुम्ही करू शकता. या योजनेचा लाभ फक्त राज्यातील बचत गटातील महिलांना (Mahila Bachat Gat) भेटणार आहे इतर राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. Women Loan Scheme

काय आहे योजना?

महिला व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक प्रगती करता यावी, यासाठी ही योजना राबवली जात आहे. यातून बचत गटांना (Self help Group) 10 ते 20 लाख रुपये तारण कर्ज दिले जाणार आहे. याकरिता राज्य शासनाकडून 21 ऑगस्ट रोजी पत्रक जारी केले आहे. त्यात सर्व बँकांनी महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी 20 लाखांपर्यंतचे भागभांडवल विना तारण कर्ज स्वरुपात उपलब्ध करून द्यावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

बचत गटाची नोंद असणे अनिवार्य

या योजनेचा लाभ घेण्याकरिता राज्य शासनाच्या (Maharashtra Government) आदेशानुसार व केंद्र सरकारच्या धोरणानुसार, महिला बचत गटांची प्रत्येक जिल्ह्यानुसार, संबंधित जिल्ह्याच्या ग्रामीण विकास यंत्रणेकडे नोंद असणे आवश्यक आहे. औरंगाबादमध्ये या योजनेवर कारवाई व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत ठराव पारीत करण्यात आला. महिला व बालविकास सभापती अनुराधा चव्हाण यांनी हा ठराव मांडला व त्याला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Documents required for the scheme)

  • Aadhar Card
  • Voter ID card
  • Bank Passbook
  • mobile number
  • (Apart from this many documents may also be required)

शुन्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा –

‘umed’अंतर्गत स्वीकारण्यात आलेल्या दशसूत्रीमुळे स्त्रियांच्या बचतगटाची गुणवत्ता ना केवळ राखली जात आहे; परंतु ती वाढत ही आहे. राज्यात आज १ लाख ८१ हजार स्वयंसाहाय्यता गट, बचतगट आहेत तर ३९५६ ग्रामसंघ काम करत आहेत. अभियानात सहभागी बचतगटांना/स्वयंसाहाय्यता गटांना आजपर्यंत ३१८७.७९ कोटी (loan for women for business) रकमेचे कर्ज विविध बँकांमार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे. जे गट नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना केंद्र शासनाच्या व्याजावरील अनुदान व (mahila loan scheme 2022) राज्य शासनाच्या सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत व्याजावरील अनुदान प्राप्त होते व त्या गटांना प्रभावी शून्य टक्के दराने कर्ज उपलब्ध होते.

गटाच्या गरजेनुसार बँकेकडून गटांना कर्ज देण्याची सोय अभियानांतर्गत करण्यात आली आहे. ‘umed’मुळे स्त्रियांना गरिबीतून बाहेर पडण्यास मदत होत आहे तसेच त्यांच्या उपजीविकेचे स्रोत बळकट होत जाताना त्यांची आत्मसन्मानाची वाट अधिक सक्षम होत आहे. या अभियानाची अधिकृत वेबसाईट http://www.umed.in ही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

error: Content is protected !!