TechnologyTrending

Electric Vehicle Charging Station: फक्त १ लाख रुपये गुंतवा अन् EV चार्जिंग स्टेशन सुरू करा; बंपर कमाईचा राजमार्ग…!

EV Charging Station Business Idea: वाढत्या महागाईच्या युगात डिझेल आणि पेट्रोलच्या किमती गगनाला भिडत आहेत. तसंच सीएनजीचे दरही वाढत आहेत.

EV चार्जिंग स्टेशनसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Electric Vehicle Charging Station: डिझेल आणि पेट्रोलच्या गगनाला भिडलेल्या किमती (Petrol Diesel Price) तुम्हाला माहीत असतीलच. सध्या सीएनजीचे दरही (CNG Price) महाग होत आहेत. त्यामुळे सध्या इलेक्ट्रिक (Electric Vehicle) वाहनांची चलती आहे. त्यामुळे प्रदूषण शून्य होते. तसेच ते चालवण्याचा खर्चही कमी आहे. त्यामुळे केवळ दिल्लीसारख्या मेट्रो शहरांमध्येच नाही तर शहरे आणि खेड्यांमध्येही ई-रिक्षा (E Rickshaw) दिसू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचा (EV Charging Station) व्यवसाय तेजीत आहे. जर तुमच्याकडे रस्त्यावर काही मीटर जमीन असेल आणि किमान एक लाख रुपयांचे भांडवल असेल तर तुम्ही हा व्यवसाय आरामात चालवू शकता. यातील चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही महानगरांपासून ते लहान शहरे, शहरे आणि गावांपर्यंत कुठेही ते स्थापित करू शकता. (How to open an electric car charging station in India)

EV चार्जिंग स्टेशन गुंतवणूक करण्यासाठी किती भांडवल आवश्यक आहे?

तुम्ही जर इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनचा (Electric Vehicles) व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर यासाठी येणारा खर्च तुम्ही वापरणाऱ्या चार्जरच्या क्षमतेवर आहे. यात कमीत कमी १ लाख रुपये खर्च येतो. पण तुम्हाला जर जास्त क्षमतेचा चार्जर बसवायचा असेल तर हाच खर्च ४० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ए.सी.स्लो चार्जर तुलनेनं स्वस्त असतात. तर डी.सी.फास्ट चार्जर महाग असतात. एका डी.सी.चार्जरची किंमत १ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत असते. तर ए.सी.चार्जरची किंमत २० हजार ते ७० हजार रुपयांच्या घरात आहे. फास्ट चार्जरचा वापर करताना फ्ल्युएड-कूल्ड बॅटरी (fluid-cooled battery) चार्ज करण्यासाठी पीसीएसमध्ये लिक्विड-कूल्ड वायर असणं गरजेचं आहे.

सरकारकडून परमिट घ्यावं लागणार का?

चार्जिंग स्टेशनसाठी कोणत्याही परमिटची आवश्यकता नाही. नव्या नियमांनुसार कोणताही व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही परवानगीविना पब्लिक चार्जिंग स्टेशन उभारू शकते. यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्यात चार्जिंग तंत्र, सुरक्षा आणि परफॉर्मिंग स्टँडर्ड आणि काही प्रोटोकॉलचं पालन करणं इतकीच काळजी घ्यावी लागते. तुमच्याकडे भांडवल कमी असेल तर काही जणांना सोबत घेऊन सेल्फ हेल्प ग्रूपच्या माध्यमातून याची सुरुवात करू शकता. सेल्फ हेल्प ग्रूपला बँकेकडून कर्ज दिलं जातं. यातून तुम्ही चार्जिंग स्टेशन सुरू करू शकता.

तुम्हाला फक्त करायचं आहे हे काम…

तुम्ही दुचाकी, तीन चाकी, व्यावसायिक, खाजगी, ट्रक किंवा विजेवर चालणाऱ्या बससाठी चार्जिंग स्टेशन (Electric Vehicle charging station near me) बनवू शकता. नफ्याबद्दल बोलायचं झाल्यास, दुचाकी, तीनचाकी, व्यावसायिक किंवा खाजगी चारचाकी वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बनवण्याचे प्रमाण अधिक आहे. चार्जिंग स्टेशन बनवण्यासाठी तुम्हाला वीज कनेक्शन घ्यावं लागेल आणि हस्तांतरण (Business Idea) देखील करावं लागेल. हस्तांतरणासह जोडण्यासाठी हेवी ड्यूटी केबलिंग काम करावं लागेल. चार्जिंग स्टेशनसाठी जमीन सर्वात महत्त्वाची बाब आहे. तुमची मालकी असेल तर ठीक आहे, नाहीतर भाडेतत्त्वावर मोक्याच्या जागेवर जमीन घेऊ शकता. आता चार्जिंग स्टेशनशी संबंधित शेड, पार्किंग एरिया इत्यादी पायाभूत सुविधा कराव्या लागणार आहेत. मुख्य खर्च चार्जिंग टॉवरच्या उभारणीवर होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

error: Content is protected !!