TechnologyTrending

Hydrogen Trains: भारतात लवकरच धावणार ‘हायड्रोजन ट्रेन’, रेल्वेने पूर्ण केली तयारी; जाणून घ्या कोणता आहे मार्ग..

Hydrogen Train in India: केंद्रीय मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी सांगितले की, या ट्रेनचे नाव ‘वंदे मेट्रो’ ठेवण्यात येणार आहे.

Hydrogen Trains: देशात ग्रीन एनर्जीला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे (Indian Railways) लवकरच ‘हायड्रोजन ट्रेन’ (Hydrogen Trains) सुरू करणार आहे. रेल्वेने यासाठी तयारीही पूर्ण केली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी ही ट्रेन देशातील 8 हेरिटेज मार्गांवर चालवली जाईल. या हायड्रोजन ट्रेनसाठी अनेक बदल करण्यात येणार आहेत. या ट्रेनच्या रचनेतही फरक असेल. हायड्रोजन ट्रेन्स 1950-60 च्या गाड्यांची जागा घेतील. डिसेंबर 2023 पर्यंत या हायड्रोजन ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.

हायड्रोजन ट्रेनला ‘वंदे मेट्रो’ नाव देण्यात येणार

हायड्रोजन ट्रेनबाबत सरकारने विशेष नियोजन केले आहे. सरकारने हायड्रोजन फॉर हेरिटेज (Hydrogen for Heritage) नावाचा प्रकल्प सुरू केला असून, त्याअंतर्गत या गाड्या हेरिटेज मार्गावर चालवल्या जातील. रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव (Railway Minister Ashwani Vaishnav) म्हणाले की, या गाड्या चालवल्याने देश हरित ऊर्जेच्या दिशेने पुढे जाईल. याआधीच केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले होते की, नव्याने तयार करण्यात आलेल्या या हायड्रोजन ट्रेनला ‘Vande Metro’ असे नाव दिले जाईल.

या मार्गावर हायड्रोजन ट्रेन धावणार

हायड्रोजन ट्रेन माथेरान हिल, दार्जिलिंग हिमालयन, कालका शिमला, कांगडा व्हॅली, बिलमोरा वाघाई, महू पातालपाणी, निलगिरी माउंटन रेल्वे आणि मारवाड देवगड मदरिया या मार्गावर धावणार आहे. नंतर ती इतर मार्गासाठी चालवली जाईल.

हायड्रोजन ट्रेन कुठे धावते

Hydrogen Train सुरू करणारा भारत हा पहिला देश नाही. यापूर्वी ही ट्रेन जर्मनी आणि चीनमध्ये धावत आहे. या वर्षी जुलैमध्ये जर्मनीमध्ये हायड्रोजन ट्रेन धावली होती. त्याची एकूण अंदाजे एकूण किंमत 586 दशलक्ष आहे. ताशी 140 किमी वेगाने ती एका वेळी 1000 किमी धावू शकते. 2018 मध्ये त्याची चाचणी घेण्यात आली. चीनने अलीकडेच आशियातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हायड्रोजनवर चालणाऱ्या या ट्रेनचा टॉप स्पीड 160 किमी प्रति तास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

error: Content is protected !!