
FIFA World Cup 2022 : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर आणि जागतिक स्तरावर लोकप्रियता असणारा खेळाडू लिओनेल मेस्सी यानं कमाल खेळाचं प्रदर्शन करत संधाला फिफाच्या अंतिम सामन्यात (FIFA World Cup 2022 Final) पोहोचवण्यासाठी मदत केली.
अर्जेंटिनाचा (Argentina) स्टार फुटबॉलटू लिओनेल मेस्सी (Lionel messi) याचा सुंदर गोल आणि त्यानं निर्णायक गोलसाठी केलेली मदत या अप्रतिम खेळाच्या बळावर हा संघ फिफाच्या अंतिम (Fifa Final match) सामन्यात पोहोचला. जगज्जेता होण्याचं स्वप्न साकारण्यापासून मेस्सी आता अवघं एक पाऊल दूर असतानाच त्याच्या चाहत्यांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. ज्यामुळं अंतिम सामन्याचा दिवसच कधी उगवू नये असं अनेकांना वाटत आहे. त्यामागचं कारणंही तसंच आहे. (FIFA World Cup 2022 argentina skipper lionel messi confirms retirment)
मेस्सीच्या कारकिर्दीचा शेवट?
18 डिसेंबरला फिफाचा अंतिम सामना हा मेस्सीचा त्याच्या देशासाठी खेळला जाणारा अंतिम सामना ठरणार आहे. खुद्द या विश्वविख्यात खेळाडूनंच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उपांत्य सामन्यात क्रोएशियाच्या संघाला नमवल्यानंतर मेस्सीनं अर्जेंटिनाच्या माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रविवारी खेळला जाणारा सामना त्याचा सहभाग असणारा देशाच्या संघाकडून खेळला जाणारा शेवटचा सामना असणार आहे. या वृत्तामुळं अनेक फुटबॉलप्रेमी आणि मेस्सीच्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
आपल्या कारकिर्दीतील अतिशय महतत्वाच्या वळणावर आलेला मेस्सी याबाबत म्हणाला, ‘मला या टप्प्यावर पोहोचण्याचा फारच आनंद होत आहे. या वळणावर माझा वर्ल्ड कपमधील प्रवास थांबवत अंतिम सामन्यात खेळणार असल्याचा मला आनंद आहे. पुढच्या वर्ल्ड कपसाठी बरीच वर्षे आहेत आणि मला वाटत नाही की माझ्यासाठी ते (खेळणं) शक्य आहे. त्यामुळं असा शेवट करणं कधीही उत्तम.’
यंदाचा वर्ल्ड कप मेस्सीनं गाजवला
फिफा 2022 वर्ल्ड कपमध्ये मेस्सीनं सुरुवातीपासूनच आपल्या खेळाच्या बळावर फुटबॉलप्रेमींना वेड लावलं. त्याचं मैदानात असणंच अनेकांसाठी खूप महत्त्वाचं ठरलं. FIFA 2022 मध्ये त्याला टार वेळा प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. फुटबॉल (Football) विश्वचषकात अंतिम सामन्यात खेळण्याची ही मेस्सीची दुसरी वेळ, यापूर्वी 2014 मध्येही त्यानं संघाचं नेतृत्त्वं केलं होतं. तेव्हापासून त्याचं विश्वविजेता होण्याचं स्वप्न अपूर्णच आहे. आता तो यावेळी हे स्वप्न पूर्ण करत आपल्या या कारकिर्दीचा अविस्मरणीय शेवट करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
फिफा विश्वचषक 2022 फायनलनंतर लिओनेल मेस्सी निवृत्त होणार?
Lionel Messi Retirement FIFA WC 2022: अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात क्रोएशियावर दणदणीत विजय नोंदवला. आता अंतिम सामन्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. अर्जेंटिनाचा महान खेळाडू आणि कर्णधार लिओनेल मेस्सी फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यानंतर निवृत्तीची Messi Retirement घोषणा करू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेस्सीने निवृत्तीची पुष्टी केली आहे. मेस्सी त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक खेळत आहे.
Lionel Messi Retirement: मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत दमदार कामगिरी करत क्रोएशियावर (Croatia) विजय मिळवला. यानंतर मेस्सीच्या निवृत्तीची बातमी समोर आली. हिंदुस्तान टाईम्सवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मेस्सीने निवृत्तीची पुष्टी केली आहे. अंतिम सामना खेळून विश्वचषकाचा प्रवास संपेल याचा मला आनंद आहे, असे मेस्सी म्हणाला. पुढचा विश्वचषक खूप दिवसांनी येणार आहे आणि तोपर्यंत मी ते करू शकेन असे वाटत नाही. अशा प्रकारे समाप्त करणे चांगले आहे.
मेस्सीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो शानदार आहे. त्याने अर्जेंटिनासाठी आतापर्यंत 171 सामने खेळले असून या कालावधीत त्याने 96 गोल केले आहेत. त्याने या वर्षात आपल्या संघासाठी 9 सामने खेळले असून 16 गोल केले आहेत. मेस्सीने 2021 मध्ये 16 सामने खेळताना 9 गोल केले. त्याने 2005 मध्ये अर्जेंटिनाकडून त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. मेस्सीने 2005 मध्ये वरिष्ठ संघाकडून तीन सामने खेळले. जरी त्याला एकही गोल करता आला नाही.
विशेष म्हणजे अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध रोमहर्षक विजयाची नोंद केली. पूर्णवेळपर्यंत दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत होते. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने ४-३ ने विजय मिळवला. यानंतर अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत क्रोएशियावर ३-० असा विजय नोंदवला. आता मेस्सीचा संघ 18 डिसेंबरला अंतिम सामना खेळणार आहे.